Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील सध्या आहे कुठे?, नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

Where Is Gautami Patil: गौतमी पाटीलचे चाहते तिच्या नव्या कार्यक्रमाची आणि नव्या सोशल मीडियाच्या (Social Media) पोस्टची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता गौतमी पाटील तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
Gautami Patil
Gautami Patil Saam Tv

Gautami Patil New Video:

'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सौंदर्य, डान्स आणि अदाकाराच्या माध्यमातून वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील आहे तरी कुठे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. गौतमी पाटीलचे चाहते तिच्या नव्या कार्यक्रमाची आणि नव्या सोशल मीडियाच्या (Social Media) पोस्टची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता गौतमी पाटील तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या या नव्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

गौतमी पाटील महाराष्ट्रभर आपल्या डान्सचे कार्यक्रम घेत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण मोठी गर्दी करतो. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांबद्दल ऐकायला मिळाले मिळाले नाही. त्यामुळे गौतमी पाटील आहे तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता गौतमीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक डान्स कार्यक्रमातील व्हिडीओ पोस्ट करत लवकरच कारेगावात कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या १५ एप्रिलला हा कार्यक्रम होणार असल्याचे तिने सांगितले आहे.

गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. केसाची वेणी, लाल रंगाची लिपस्टिक, कपाळावर छोटीशी टिकली असा लूक गौतमीने केला आहे. गौतमीने एका हिंदी गाण्यावर ही रील तयार केली असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओतील तिच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर गौतमीला पाहून तिचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. गौतमीच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. राणी आहेस पण तू, क्रिश, ओनली गौतमी पाटील, सुंदर अशाप्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

डान्स कार्यक्रम नाही पण गौतमी पाटीलचे चाहते तिला उद्घाटनाच्या कार्यक्रमांना बोलावत आहेत. नुकताच गौतमीने बर्गर राजा या शॉपचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला गौतमी पाटील पोपटी रंगाची साडी नेसून गेली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यासोबतच गौतमी पाटीलने काही तासांपूर्वी फेटा बांधलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर कमेंट्स करत चाहत्याने तिला भावी खासदार म्हटले आहे. गौतमीचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Gautami Patil
Box Office Collection: 'मडगांव एक्स्प्रेस' सुसाट, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला मागे टाकत केली इतकी कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com