Naseeruddin Shah Birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naseeruddin Shah Birthday : भयंकर! नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केलेला चाकू हल्ला, थोडक्यात वाचला अभिनेत्याचा जीव

Naseeruddin Shah And Om Puri Friendship : नसीरुद्दीन शाह यांचं नाव अशा कलाकारांमध्ये घेतलं जातं, ज्यांनी मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली.

Chetan Bodke

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज (२० जुलै) ७४ वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांचं नाव अशा कलाकारांमध्ये घेतलं जातं, ज्यांनी मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिका अक्षरशः पडद्यावर जिवंत केल्या. नसीरुद्दीन यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात आपला ठसा उमटवला आहे. अभिनयातले राजा माणूस असलेल्या नसीरुद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लाईफमधील काही किस्से जाणून घेऊया...

अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अभिनेता ओम पुरी यांची फ्रेंडशिप सर्वश्रुत आहे. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या 'अँड देन वन डे: अ मेमर' (And Then One Day: A Memoir) नावाच्या पुस्तकात त्यांच्या मैत्रीबद्दल एका धक्कादायक घटनेवर भाष्य केले आहे. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘भूमिका’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. चित्रपटामध्ये ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. एक दिवसाचं शूटिंग संपल्यानंतर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह सेटजवळील एका ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी नसीरुद्दीन शाह यांचा मित्र जसपाल अभिनेत्याच्या दिशेने धावत येत होता. हे ओम पुरी यांनी पाहिलं. जसपालने अभिनेत्यावर कोणालाही काही कळण्याआधी धारदार हत्याराने वार केला होता.

तो अभिनेता दुसरा वार करण्याच्याही तयारीत होता. पण इतक्यात ओम पुरी यांनी जसपालचा हात पकडला. आणि जोपर्यंत तो हातातला चाकू टाकत नव्हता तोपर्यंत पकडून धरला. पहिल्याच घावामुळे नसीरुद्दीन रक्तबंबाळ झाले होते. झालेली घटना ओम पुरी यांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर जसपालला पोलिसांनी अटक केली. ओम पुरी यांनी आपल्या मित्राला पोलिसांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेलं. ओम पुरी यांनी मित्राचा जीव वाचवल्यामुळे ते कायमच त्यांचे आभार मानत असतात. ओम पुरी यांनी मोठा धोका पत्करून आपल्या मित्राचा जीव वाचवला.

नसीरुद्दीन नेहमीच जसपालला खूप चांगला मित्र समजायचे. पण नसीर यांचं यश जसपालच्या डोळ्यात खुपत होते. म्हणून त्याने नसीर यांच्यावर हल्ला केला, असं नसीरुद्दीन यांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः सांगितलं आहे. ओम पुरी यांनी नसीरुद्दीन यांना जुहूच्या कूपर हॉस्पिटलमध्ये नेले होते. अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अभिनेता ओम पुरी यांनी 'मकबूल' आणि 'जाने भी दो यारो' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT