संजय गडदे
Mumbai News : मुंबईकरांसाठी चांगली बातमी हाती आली आहे. केईएम, नायर, सायन रुग्णालयानंतर आता पश्चिम उपनगरातील कुपर रुग्णालयात प्रथमच अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कुपर रुग्णालयात पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर मोफत अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील लाखो रुग्णांना याचा लाभ होणार आहे. (Latest Marathi News)
पश्चिम उपनगरातील विलेपार्ले येथील मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात आज पहिल्यांदाच अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. पहिल्याच दिवशी रुग्णालयाने हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ६० वर्षांवरील ३ रुग्णांवर यशस्वी अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे केईएम, नायर, सायन या मुंबई शहरातील महापालिका रुग्णालयानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अँजियोप्लास्टी करणारे हे पहिलेच रुग्णालय ठरले. या तीनही रुग्णांवर मोफत एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
पश्चिम उपनगरातील हृदयविकार असणाऱ्या हजारो रुग्णांना उपचारासाठी यापूर्वी महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असे. मात्र तिकडे रुग्णांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पर्यायाने या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असे. याचा फटका रुग्णाच्या खिशाला बसत असे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आता पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयात हृदय रुग्णावरील अँजिओप्लास्टी ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे याचा लाभ पश्चिम उपनगरातील हजारो रुग्णांना होणार आहे.
कूपर रुग्णालयात अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. डॉ. शैलेश मोहिते म्हणाले, कूपर रुग्णालयात अँजिओप्लास्टीच्या प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यांपासून सुरू होत्या. आज, रुग्णालयात पहिली अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली. डॉ. अजय महाजन यांनी पहिली अँजिओप्लास्टी केली. आज तिघांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. त्या रुग्णांना एकही रुपयांचा खर्च आला नाही. यामुळे याचा लाभ पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना होईल. आजपासून अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू केली'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.