Mumbai : सुशांत सिंग प्रकरणात मनसेची उडी; कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या दाव्यानंतर नेत्यांनी केली 'ही' मागणी

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला नव वळण लागल्यानंतर त्यात आता मनसेने उडी घेतली आहे
Sushant Singh Case
Sushant Singh Case Saam Tv

संजय गडदे

Sushant Singh Rajput Case : अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला नव वळण लागल्यानंतर त्यात आता मनसेने उडी घेतली आहे. कूपर रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शहा यांनी सुशांत सिंग हत्या झाल्याचा दावा केल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसे नेत्यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात शव विच्छेदन अहवाल चुकीच्या देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Sushant Singh Case
Narayan Rane on Disha Salian case : दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांची हत्याच, नारायण राणे यांचा पुनरुच्चार

सिनेअभिनेता अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचा खळबळजनक दावा रूपकुमार शाह यांनी केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. सुशांतसिंग यांचा शव विच्छेदन अहवाल चुकीच्या पद्धतीने देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष कुशाल धुरी यांनी महापालिकेच्या कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

Sushant Singh Case
Nitesh Rane Live: नागपुरातून नितेश राणे Live; "सुशांत केसमध्ये आदित्य यांचंच नाव का येतं?

काय म्हणाले होते रुपकुमार शाह?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच झाली, असा दावा रुपकुमार शाह यांनी केला. सुशांतचा मृतदेह आला त्यावेळी मृतदेहावर जखमा होत्या. शरीराला मुका मार लागलेला होता. मृतदेहावर शवच्छेदन होत असताना मी पूर्ण वेळ तिथे होतो. डॉक्टरांना मी सांगितलं, की ही सुसाईड केस नाहीये मर्डर केस आहे. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही, असा दावाही शाह यांनी केला.

रुपकुमार शाह हे मुंबईतील (Mumbai) कूपर रुग्णालयातील शवागृहात 13 ते 14 जून 2020 ला कर्तव्यास होते. दीड महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना हा दावा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com