War 2 VS Coolie Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 VS Coolie Collection : 'कुली'ची 300 कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू, 'वॉर 2'नं किती कमावले?

War 2 VS Coolie Box Office Collection Day 10 : 'वॉर 2' आणि 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाले आहेत. दोन्ही चित्रपटांनी 10 दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाले.

रजनीकांत यांचा 'कुली' लवकरच 300 कोटींचा टप्पा गाठणार आहे.

'कुली'ने जगभरात तगडी कमाई केली आहे.

'सैयारा'नंतर सर्वत्र 'कुली'चा (Coolie ) बोलबाला दिसत आहे. 'कुली' चित्रपटाने आपले बजेट देखील वसूल केले आहे. 'कुली'मध्ये रजनीकांत (Rajinikanth ) यांच्यासोबत आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कुली' तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे साऊथ अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर 2' (War 2) देखील 14 ऑगस्टला रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमावले, जाणून घेऊयात.

'कुली' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली आहे. रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने 10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. दुसऱ्या शनिवारी देखील 'कुली' ने 'वॉर 2'ला मागे टाकले आहे. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 245.50 कोटी रुपये झाले आहे.

'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि बॉलिवूडचा स्टार अभिनेता असलेला हृतिक रोशनचा 'वॉर 2'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 'वॉर 2' ने दुसऱ्या शनिवारी 6.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. जो तुलनेने 'कुली' चित्रपटापेक्षा कमी आहे. 'वॉर 2'ने 10 दिवसांत तब्बल 214.50 कोटी कमावले आहेत. भविष्यात हो दोन्ही चित्रपट किती कमाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'वॉर 2'

'वॉर 2' मध्ये ज्युनिअर एनटीआर , हृतिक रोशनसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील झळकली आहे. ती चित्रपटात एका खास अंदाजात पाहायला मिळत आहे. 'वॉर 2'ला सुपरॲक्शन चित्रपट आहे. वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर'चा सीक्वल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच, गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT