Haiwan Movie Update
Akshay Kumar-Saif Ali KhanSAAM TV

Akshay Kumar-Saif Ali Khan : अक्षय-सैफ तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र; 'हैवान'चं शूटिंग सुरू, पाहा VIDEO

Haiwan Movie Update : अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या आगामी चित्रपट 'हैवान'चे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटानिमित्त सैफ अली खान आणि अक्षय कुमारची जोडी तब्बल 18 वर्षांनी एकत्र काम करत आहे.
Published on
Summary

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'हैवान'चे शूटिंग सुरू झाले आहे.

'हैवान'मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान एकत्र झळकणार आहेत.

अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनी एकत्र काम करत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या लागोपाठ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच त्याचा 'हाऊसफुल 5' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटाली आला. आता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच 'हैवान' (Haiwan) चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. याचा खास व्हिडीओ अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'हैवान' चित्रपटात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार झळकणार आहे. तब्बल 18 वर्षांनी अक्षय कुमार आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) एकत्र काम करणार आहेत. ही जोडी शूटिंग सेटवर पोहचली आहे. अक्षय कुमारने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अक्षय कुमार आणि सैफ अली खान दिसत आहे. या व्हिडीओला अक्षयने हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "हम सब ही हैं थोडा से शैतान...कोई उपर से संत, कोई अंदर से हैवान...चला हैवानियत सुरू करूया!"

व्हिडीओमध्ये अक्षय कुमारच्या हातात 'हैवान' चित्रपटाच्या नावाची पाटी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक पाहायला मिळत आहेत.

वर्कफ्रंट

आजवर अक्षय कुमार आणि सैफ अली खान अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी', 'टशन', 'तू चोर मैं सिपाही' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता अरशद वारसी झळकणार आहे.

Haiwan Movie Update
"क्या खूब चलेगी यहाँ घरवालों की सरकार..."; 'Bigg Boss 19'च्या घराची पहिली झलक, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com