Akshay Kumar: पंजाबी चित्रपटसृष्टीने एका मोठ्या कलाकाराला गमावले आहे. प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि विनोदी कलाकार जसविंदर भल्ला यांचे शुक्रवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांचा फोटो शेअर करून अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे
जसविंदर भल्ला यांच्या निधनाच्या बातमीने पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला धक्का बसला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लिहिले, भल्ला साहेबांचे जाणे पंजाबी चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान आहे. तुस्सी बहुत याद आओगे भल्ला जी.' तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील दिवंगत कलाकाराला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटून शोक व्यक्त केल्या.
विनोदी कलाकार म्हणून काम
१९६० मध्ये जन्मलेल्या जसविंदर भल्ला यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यादरम्यान त्यांचा रंगमंचाकडे कल वाढला आणि त्यांनी "छंकटा ८८" सारख्या मालिकेतून विनोदी कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. या शोच्या यशाने त्यांना अनेक काम मिळायला सुरुवात झाली.
सुपरहिट चित्रपटांचा प्रवास
जसविंदर भल्ला यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. 'कॅरी ऑन जट्टा', 'जट्ट अँड ज्युलिएट २', 'जट्ट एअरवेज' आणि 'महौल ठीक है' सारख्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'शिंदा शिंदा नो पापा' (२०२४) होता, ज्यामध्ये तो गिप्पी ग्रेवाल आणि हिना खान यांच्यासोबत दिसला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.