Virat-Anushka SAAM TV
मनोरंजन बातम्या

Virat-Anushka : विराट-अनुष्का मुलांसह पोहोचले घरी; नातवंडांना पाहून आजीनं मारली मिठी,पाहा क्युट VIDEO

Virat-Anushka Viral Video : विराट आणि अनुष्का सहकुटुंब घरी पोहचले आहे. नातवंडांना पाहून आजीला खूप आनंद झाला आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे पावर कपल आहे. अलिकडेच ही जोडी अनेक कारणांमुळे चर्चेत होती. आता अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनुष्का आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.

विराट कोहलीने 'कसोटी क्रिकेट'मधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे. यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र विराटची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता अनुष्का, विराट आणि त्यांची दोन मुलं कुटुंबासह अकाय-वामिकाच्या आजीच्या घरी पोहचले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनुष्का, विराट, अकाय आणि वामिका अनुष्काच्या आईच्या घरी गेले आहेत.

अनुष्काचे माहेरी दणक्यात स्वागत होताना पाहायला मिळत आहे. अनुष्काने अकायला कुशीत घेतले आहे. तर वामिका आईच्या बाजूला उभी आहे. विराट गाडीच्या बाजूला कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अनुष्का आणि आपल्या दोन्ही नातवंडांना पाहून अनुष्काची आई खूप खुश होते. आनंदाने ती अनुष्का आणि अकायला मिठी मारते आणि नंतर अकाय उचलून घेते तर वामिकाला जवळ करते. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अनुष्का, विराट आणि दोन्ही नातवंडांना भेटून अनुष्काच्या आईला खूपच आनंद झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनुष्काने व्हाइट टीशर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केली आहे. अनुष्का आणि विराटने कायमच आपल्या मुलांचे आयुष्य खाजगी ठेवले आहे. मात्र या व्हिडीओमध्ये अकाय आणि वामिकाची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. 'कसोटी क्रिकेट'मधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुष्का आणि विराट प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेताना दिसले. त्यांचा भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT