भारत-पाकिस्तान युद्धामुळे सर्वत्र संतप्त वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारापर्यंत प्रत्येकजण यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यामुळे 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam 2) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन झळकली होती. भारत-पाकिस्तान युद्धानंतर मावरा होकेनने (Mawra Hocane) दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हर्षवर्धन राणेने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.
बॉलिवूडचा अभिनेता हर्षवर्धन राणेने अलिकडेच एक पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होत की,"सध्याची परिस्थिती पाहून आणि माझ्या देशावर केलेल्या टिका वाचल्यानंतर मी ठरवले आहे की, जर जुने कलाकार पुन्हा चित्रपटात सामील होणार असतील तर मी 'सनम तेरी कसम 2'चा भाग होण्यास नकार देईन." हर्षवर्धनच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर सर्वत्र मावरा होकेनची चर्चा रंगली होती. आता यावर 'सनम तेरी कसम 2' चित्रपटाच्या सह दिग्दर्शक विनय सप्रू यांनी मोठी खुलासा केला आहे.
'सनम तेरी कसम 2' चित्रपटाच्या सह दिग्दर्शक विनय सप्रूने एका मुलाखतीत सांगितले की, "पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन 'सनम तेरी कसम 2' मध्ये दिसणार नाही आहे. " या बातमीमुळे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. यामुळे हर्षवर्धन राणेची चित्रपटातील एन्ट्री देखील निश्चित झाली आहे. आता मावरा होकेनच्या जागी 'सनम तेरी कसम 2'मध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यात प्राधान्याने 'स्त्री' श्रद्धा कपूरचे नाव पाहायला मिळत आहे.
हर्षवर्धन आणि मावराचा 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2025 ला चित्रपट पुन्हा 'सनम तेरी कसम' प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते दीपक मुकुट यांनी 'सनम तेरी कसम 2' ची घोषणा केली. चाहते 'सनम तेरी कसम 2' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.