Urfi Javed : उर्फी जावेदची 'कान्स फेस्टीव्हल'ला जाण्याची संधी हुकली, 'हे' ठरलं कारण

Cannes Film Festival 2025: आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचे 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'ला जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
Cannes Film Festival 2025
Urfi JavedSAAM TV
Published On

'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'ला (Cannes Film Festival 2025) नुकतीच सुरुवात झाली आहे. या फेस्टीव्हलमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांचे हटके लूक पाहायला मिळत आहे. या फेस्टीव्हलचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या फेस्टीव्हलला हजेरी लावतात आणि आपल्या खास लूकने चाहत्यांना भुरळ घालतात. यंदा अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र यंदा बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले.

'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेली अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडची कायम चर्चेत असेली उर्फी जावेद (Urfi Javed) आहे. उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. ती आपल्या ड्रेसमुळे कायम चर्चेत असते. उर्फी जावेदला 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. मात्र एका गोष्टीमुळे तिचे हे स्वप्न अपूर्ण राहीले. याची माहिती उर्फीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.

उर्फी जावेद पोस्ट

"सध्या माझा बिझनेस ठप्प झाला आहे. मी रिजेक्शन झेलत आहे. अशात मला 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'ची संधी मिळाली होती. पण माझ्या वाईट नशिबामुळे माझा व्हिसा नाकारला. काही क्रेझी आउटफिट कल्पनांवर काम करत होते. माझी टीम आणि मी खूप निराश झालो आहे. मला खात्री आहे तुम्ही देखील बऱ्याच वेळा नकारातून जात असाल...चला तर मग एकमेकांना पाठिंबा देऊया आणि पुढे जाऊया. नकार हा जगाचा अंत नाही, तो तुम्हाला फक्त अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करेल. नकारानंतर, नाकारल्यासारखे वाटणे आणि त्यावर रडणे सामान्य आहे... काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक नकार ही एक संधी आहे. आयुष्यात इतक्या नकारांनंतर मी कधीच थांबले नाही आणि म्हणून तुम्हीही करू नये."

उर्फी जावेदचा व्हिसा रिजेक्ट झाल्यामुळे ती 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025' भाग घेऊ शकली नाही. उर्फी जावेदने या पोस्टला एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं की, "नकार तुम्हाला परिभाषित करत नाहीत. त्या परिस्थितीतून काय शिकता हे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या नकाराच्या कथा शेअर करूया आणि इतरांना प्रेरणा देऊया."

Cannes Film Festival 2025
Dhadkan Re Release : "ना ना करते प्यार..."; अक्षय-शिल्पाचा 'धडकन' २५ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला, कुठे अन् कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com