Pahalgam Terror Attack: जायचं होतं युरोपला, व्हिसा रिजेक्ट झाला म्हणून गेले काश्मिरला; लग्नानंतर सहाव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू

Navy Officer Death in Kashmir Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचा अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Navy Officer Death in Kashmir Terror Attack
Pahalgam Terror AttackSaam Tv
Published On

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतपर्यंत २८ पर्यटकांचा मृ्त्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचा अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला. विनय नरवाल असं या नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. १६ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले होते आणि ते हनिमूनसाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. (Palagam Terror Attack)

लेफ्टनंट विनय नरवाल हे मूळचे हरियाणातील करनाल जिल्ह्यातील भूसली गावचे रहिवासी होते. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात विनय यांची बायको सुरक्षित आहे. हे कपल हनीमूनसाठी सोमवारी श्रीनगरला पोहोचले होते. त्यानंतर पहलगामला भेट देण्यासाठी ते गेले होते. लेफ्टनंट विनय नरवाल यांची दहशतवाद्यांनी हत्या केली त्यावेळी त्यांची बायको मदतीसाठी सर्वांकडे विनंती करत होती. या घटनेनंतर विनय यांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्यांच्या बायकोचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Navy Officer Death in Kashmir Terror Attack
Jammu Kashmir: 'ईट का जवाब ईट से, 'खून का बदला खून से'; एकनाथ शिंदे दहशतवादी हल्ल्यावर काय म्हणाले? VIDEO

विनय नरवाल हे हरियाणाच्या करनालमधील सेक्टर ७ चे रहिवासी होते. २ वर्षांपूर्वी ते नौदलात कामासाठी रुजू झाले होते. १६ एप्रिल रोजी त्यांचे हिमांशीसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात करण्यापूर्वीच अनर्थ घडला. लग्न झाल्यानंतर विनय बायको हिमांशीसोबत जम्मू-काश्मीरला हनिमूनसाठी गेले होते. यादरम्यान विनय सोमवारी बायकोसोबत श्रीनगरला भेट देण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान हा भ्याड हल्ला झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

विनय आणि त्यांच्या बायकोला हनिमूनसाठी युरोपामध्ये जायचे होते. पण व्हिसा रिजेक्ट झाल्यामुळे ते काश्मिरला गेले. या दहशतवादी हल्ल्यात लग्नानंतर सहाव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू झाला. विनय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या बायकोला मोठा मानसिक धक्का बसला. तसंच घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरला रवाना झाले आहेत.

Navy Officer Death in Kashmir Terror Attack
Jammu Kashmir: पोकळ दावे बंद करा, जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर सरकारने जबाबदारी घ्यावी- राहुल गांधी|VIDEO

हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीचा विनय यांच्या बायकोचा एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांची बायको थरथरत्या आवाजात म्हणाली, 'आम्ही फक्त भेळपुरी खात होतो... त्यानंतर त्याने माझ्या नवऱ्याला गोळी मारली. त्या बंदूकधारी दहशतवाद्याने माझ्या नवऱ्याला त्याच्या धर्माबद्दल विचारले. त्यानंतर तुझा नवरा मुस्लिम नाही म्हणत त्याने माझ्या नवऱ्याला गोळी मारली.' लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरूवात करण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी विनय आणि त्यांच्या बायकोचे सुखी संसाराचे स्वप्न भंग केले.

Navy Officer Death in Kashmir Terror Attack
Jammu Kashmir: जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 20 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com