Jammu Kashmir: 'ईट का जवाब ईट से, 'खून का बदला खून से'; एकनाथ शिंदे दहशतवादी हल्ल्यावर काय म्हणाले? VIDEO

Tit for Tat: Shinde Vows Strong Response to Kashmir Terror Strike: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत या सगळ्याचा बदला घेतला जाईल असे सांगितले.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्याचा एकनाथ शिंदे यांनी निषेध व्यक्त करत लवकरच याचा बदला घेतला जाईल असे सांगितले. गृहमंत्री हे तिथे पोहचत आहे, मी स्वतः लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या ADC सोबत बोललो आहे. त्यांना ही सर्व माहिती दिली असून तिथल्या सर्व लोकांना मदत मिळेल आणि त्यांना लवकरच इकडे आणण्याची व्यवस्था होईल असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. या हल्ल्यात झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास मोदी आणि अमित शहांवर आहे. ज्याप्रकारे धर्म आणि नाव विचारून हल्ला झाला आहे यांचा बदला घेतला जाणार असून 'ईट का जवाब ईट से, 'खून का बदला खूनसे' असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com