Virat Kohli-Anushka Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat and Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार? 'या' जवळच्या व्यक्तीने सांगितले सत्य

Virat and Anushka: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Virat and Anushka: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, "विराट आपल्या पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनमध्ये स्थायिक होण्याची योजना आखत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे जाणार आहे."

कोहली आणि अनुष्काने लंडनमध्ये आधीच एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे आणि त्यांच्या मुलगा अकायचा जन्मही १५ फेब्रुवारी २०२४ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यामुळे ते लंडनमध्ये स्थायी होण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच अनुष्का शर्मा देखील सध्या तिच्या करिअरपासून विश्रांती घेत असून, कुटुंबाला अधिक वेळ देत आहे.

विराट कोहलीच्या रिटायरमेंटबद्दल अफवा पसरत असताना, कोच राजकुमार शर्मा यांनी या बातम्या फेटाळलया आहेत. ते म्हणाले, "विराट अजूनही अत्यंत फिट आहे आणि निवृत्तीच्या विचारात नाही. माझ्या मते, तो पुढील पाच वर्षे क्रिकेट खेळेल आणि २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल."

लंडनमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजांवर आधारित आहे. लंडनमध्ये त्यांना अधिक प्रायव्हेट आणि नॉर्मल आयुष्य जगता येईल. जे भारतात काहीसे शक्य नाही. या निर्णयामुळे विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. पण, त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी आश्चर्यजनक आहे.​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT