Akshaye Khanna: 'छावा' फेम अक्षय खन्नाला नाही करायचे अमिताभ बच्चनसोबत काम; म्हणाला, 'समान करणे कठीण...'

Akshaye khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय खन्नाने सध्या 'छावा' या चित्रपटामुळे त्याच्या अभिनयामुळे सध्या चर्चेत आहे.
Akshaye Khanna
Akshaye KhannaSaam Tv
Published On

Akshaye Khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, ज्यात त्यांने आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर केली होती. ​

२००८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, अक्षय खन्नाने सांगितले की, "काही लोकांसोबत काम करणे टाळावे, माझे वडील आणि अमिताभ बच्चन हे त्यापैकी आहेत. त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये उभे राहणे अवघड आहे, कारण त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स इतका प्रभावी आहे की, ती इतरांना सपोर्टला असल्यासारखे वाटते ." त्याने हेही कबूल केले की, "माझ्याकडे असा प्रेझेन्स नाही, जी त्यांच्या समोर टिकू शकेल." ​

Akshaye Khanna
Director Arrested: एक्साइज विभागाची मध्यरात्री रेड, २ दिग्दर्शकांना अटक, चित्रपटसृष्टीत खळबळ

अक्षय खन्नाने २००४ मध्ये 'दीवार: लेट्स ब्रिंग अवर हीरोज होम' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. ​वडिलांच्या बायोपिकमध्ये काम करण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, अक्षय खन्नाने सांगितले की, "मी माझ्या वडिलांसारखा दिसत नाही, त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे शक्य नाही. बायोपिकमध्ये काम करण्याबाबत मी कधीही त्याबद्दल विचार केला नाही." ​

Akshaye Khanna
Majhi Prarthana: प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी; 'माझी प्रारतना' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

अक्षय खन्नाने सध्या 'छावा' या चित्रपटात औरंगजेबच्या भूमिकेत दिसले आहेत, ज्यात त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या असून, त्याच्या अभिनय कौशल्याची चाहते सतत प्रशंसा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com