Director Arrested: एक्साइज विभागाची मध्यरात्री रेड, २ दिग्दर्शकांना अटक, चित्रपटसृष्टीत खळबळ

Director Arrested: चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांना २७ एप्रिल २०२५ रोजी कोची येथे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Director Arrested
Director ArrestedSaam Tv
Published On

Director Arrested: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक खालिद रहमान आणि अश्रफ हम्झा यांना २७ एप्रिल २०२५ रोजी कोची येथे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. कोचीतील गोस्री ब्रिजजवळील एका फ्लॅटवर रात्री २ वाजता एक्साइज विभागाने छापा टाकून १.६ ग्रॅम 'हायब्रिड गांजा' जप्त केला. या कारवाईत त्यांच्यासोबत शालिफ मोहम्मद या मित्रालाही अटक करण्यात आली.

एक्साइज अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिघेही गेल्या चार ते पाच वर्षांपासून नियमितपणे अंमली पदार्थांचा वापर करत होते. ज्या फ्लॅटमध्ये ही कारवाई झाली, तो फ्लॅट प्रसिद्ध छायाचित्रकार समीयर थाहीर यांचा असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन नियमितपणे होत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. ​

Director Arrested
Cotton Trendy Kurtis: उन्हाळ्यात ट्रेंडी कूल लूकसाठी हे ७ स्टायलिश कुर्ते नक्की ट्राय करा

या घटनेनंतर, फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरल (FEFKA) ने दोन्ही दिग्दर्शकांना संघटनेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. FEFKA चे अध्यक्ष सिबी मलयिल यांनी सांगितले की, "चित्रपटसृष्टीतील वाढत्या ड्रग्ज वापराच्या पार्श्वभूमीवर आम्ही कठोर पावले उचलत आहोत. या प्रकरणात संबंधित दिग्दर्शकांना निलंबित करण्यात येईल." ​

Director Arrested
Nana Patekar: आधी पाहुणचार, मग भांडी घासायचं काम; परेश रावल यांनी सांगितला नाना पाटेकरांचा मजेदार किस्सा

खालिद रहमान हे 'अलप्पुझा जिमखाना', 'उंडा' आणि 'थल्लुमाला' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात, तर अश्रफ हम्झा यांनी 'थमाशा' आणि 'भीमंते वाझी' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या अटकेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, ड्रग्ज वापराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. या तिघांनाही अटक केल्याच्या काही काळानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडण्यात आले. ​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com