Nana Patekar: आधी पाहुणचार, मग भांडी घासायचं काम; परेश रावल यांनी सांगितला नाना पाटेकरांचा मजेदार किस्सा

Nana Patekar And Paresh Rawal: नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. अलिकडेच परेश रावल यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे.
Nana Patekar And Paresh Rawal
Nana Patekar And Paresh RawalSaam Tv
Published On

Nana Patekar And Paresh Rawal: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, एकदा नाना पाटेकर यांनी एका निर्मात्याला जेवणासाठी घरी बोलावलं आणि जेवणानंतर ताटं घासायला लावल. हा किस्सा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

नाना पाटेकरांनी निर्मात्याला भांडी धुवायला लावली

परेश रावल यांनी नुकताच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "एक निर्माता होता. मी त्याचे नाव घेणार नाही. नानांनी त्याला एके दिवशी घरी येण्यास सांगितले. त्याने विचारले, 'तू मटण खातोस का?' निर्मात्याने जेवण केले. जेवण झाल्यावर नाना म्हणाले - 'तू जेवलास ना? आता भांडी धुऊन ये.'

Nana Patekar And Paresh Rawal
A.R Rahman: एआर रहमानला मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला २ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

या प्रसंगानंतर, त्या निर्मात्याने नानांच्या साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा केली. त्याने सांगितले की, नाना पाटेकर यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराकडून अशी शिकवण मिळणं, हे त्याच्यासाठी भाग्याचं होतं. नानांचा हा स्वभाव त्यांच्या चाहत्यांमध्येही प्रसिद्ध आहे.

Nana Patekar And Paresh Rawal
अक्षय कुमारच्या Kesari 2 वर चोरीचा आरोप, थेट पुराव्याचा व्हिडिओ टाकत केली पोलखोल

परेश रावल पुढे म्हणाले, नाना पाटेकर एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांच्या अभिनय क्षमतेला आणि प्रामाणिकपणाला पाहता, हे मानधन योग्यच आहे. नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील एक आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जातात, ज्यांच्याकडून सर्वांनी शिकण्यासारखं खूप काही आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com