
Kesari 2 Movie: अक्षय कुमारच्या 'केसरी 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग' चित्रपटावर यूट्यूबर आणि कवी याह्या बूटवाला याने गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील काही संवाद त्यांच्या 'जलियांवाला बाग' या कवितेतील ओळींचे थेट अनुकरण आहेत. याह्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल सांगितले आहे, ज्यात त्याने त्याच्या कवितेच्या ओळी आणि चित्रपटातील संवाद यांची तुलना केली आहे.
याह्या बूटवाला याने स्पष्ट केले की, त्यांच्या कवितेतील ओळी 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या 'मेरी फितरत है मस्ताना' या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांनी हेही सांगितले की, 'केसरी 2' च्या ट्रेलरमध्ये वापरलेले संवाद त्याच्या कवितेच्या ओळींसारखेच आहेत. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या कवितेच्या ओळी आणि चित्रपटातील संवाद यांची तुलना केली आहे.
याह्याने त्याच्या कवितेतील ओळी आणि अनन्याचे संवाद पोस्ट केले
याह्याने स्वतः एक कविता म्हणतानाचा व्हिडिओ आणि चित्रपटातील अनन्या पांडेच्या संवादांचा व्हिडिओ शेअर केला आहे. याह्याने पोस्ट केलेल्या कवितेच्या ओळी अशा आहेत - चलते-चलते मैं एक दीवार के पास पहुंचा, वहां गोलियों के निशान थे। वहां से फुसफुसाने की आवाज आ रही थी।. तर, याह्याने पोस्ट केलेल्या अनन्याच्या व्हिडिओमध्ये अनन्या म्हणत आहे - दीवारों के ज्यादा पास जाओ ना, तो फुसफुसाने की आवाजें आती हैं।
चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा लेखकांनी या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, याह्या बूटवाला याने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला आहे. त्याने हेही नमूद केले की, त्यांच्या कवितेचा वापर त्याच्या परवानगीशिवाय केला गेला आहे, जे कायदेशीर रित्या अनुचित आहे.
'केसरी 2' हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा जलियांवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणता परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.