Actress Threat: 'काश्मीरला जाण्यापूर्वी कलमा शिक, अन्यथा...' या प्रसिद्ध अभिनेत्रीला पाकिस्तानी मित्राचा इशारा

Actress Threat: बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीने नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. तिच्या एका पाकीस्तानी मित्राने धमकी दिल्याचे सोशल मीडियावर तिने सांगितले आहे.
Actress Threat
Actress ThreatSaam Tv
Published On

Actress Threat: बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पायल घोषने नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या एका पाकिस्तानी अभिनेता मित्राने तिला काश्मीरला जाण्यापूर्वी 'कलमा' शिकण्याचा सल्ला दिला, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या विधानामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे.​

पायल घोषने यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. 2020 मध्ये तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर शारीरिक शोषणाचे आरोप केले होते, जे त्याने नाकारले होते. त्यानंतर तिने राजकारणात प्रवेश करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले) च्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.​

Actress Threat
Riteish Deshmukh Movie: रितेश देशमुखच्या चित्रपटातील डान्सर तरूण नदीत बुडाला; २ दिवसांनी सापडला मृतदेह
payal Ghosh story
payal Ghosh storySaam Tv

अलीकडेच, पायलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने लिहिले होते की, "मी पायल घोष, जर माझे आत्महत्या किंवा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तर याकरता जबाबदार असणारे लोक आहेत..." या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती. त्यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने लिहिले की, "मला जर काही झाले ना तर कोणी वाचणार नाही. माझ्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारा की मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. मी सुशांत नव्हे मी पायल घोष आहे. मेले तर सर्वांना यामध्ये अडकवून मरेन."​

Actress Threat
Sara Ali Khan: एकीकडे श्रद्धांजली, तर दुसऱ्या बाजूला काश्मीर ट्रिपचे फोटो; सारा अली खानच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात

या सर्व घटनांमुळे पायल घोष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या या विधानांवर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिच्या या दाव्यांमुळे काश्मीरमधील परिस्थिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com