Riteish Deshmukh Movie: रितेश देशमुखच्या चित्रपटातील डान्सर तरूण नदीत बुडाला; २ दिवसांनी सापडला मृतदेह

Riteish Deshmukh Set In satara: सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथे रितेश देशमुखच्या "राजा शिवाजी" या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना एक कलाकाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
Riteish Deshmukh Movie
Riteish DeshmukhSaam Tv
Published On

Riteish Deshmukh: ​रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाच्या साताराच्या माहुली येथील कृष्णा नदीच्या सेटवर शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी कोरिओग्राफी टीमचा एक सदस्य कृष्णा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला असून, दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.​

ही घटना चित्रपटाच्या शूटिंगसाठी निवडलेल्या लोकेशनवर घडली. शूटिंगदरम्यान कोरिओग्राफी टीमचा सदस्य नदीत पडला आणि प्रवाहात वाहून गेला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली होती.​ दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, स्थानिक प्रशासनाने मृतदेह शोधून काढला.

Riteish Deshmukh Movie
Sara Ali Khan: एकीकडे श्रद्धांजली, तर दुसऱ्या बाजूला काश्मीर ट्रिपचे फोटो; सारा अली खानच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात

या घटनेमुळे चित्रपटाच्या टीममध्ये शोककळा पसरली आहे. रितेश देशमुख आणि संपूर्ण टीमने या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.​ या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटाच्या शूटिंगला काही काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. टीमने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहानुभूती व्यक्त केली असून, त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Riteish Deshmukh Movie
Hina Khan: मी एक मुस्लिम आहे पण...; काश्मिरी हिना खानची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर माफी मागणारी पोस्ट

'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, रितेश देशमुखचा हा दुसरा दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात स्वतः रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी केली आहे.​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com