Sara Ali Khan: एकीकडे श्रद्धांजली, तर दुसऱ्या बाजूला काश्मीर ट्रिपचे फोटो; सारा अली खानच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात

Sara Ali Khan Trolled: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर, तिने जरी शहीद झालेल्या पर्यटकांसाठी शोक व्यक्त केला आहे.
Sara Ali Khan Trolled
Sara Ali Khan TrolledSaam Tv
Published On

Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर, तिने जरी शहीद झालेल्या पर्यटकांसाठी शोक व्यक्त केला असला तरी त्याच वेळी तिने काश्मीरमधील तिच्या ट्रिपचे जुने फोटो शेअर केले. या पोस्टमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सारा अली खानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पहलगाम हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'या क्रूर अत्याचाराने मन दुखावले, धक्का बसला आणि घाबरले. पृथ्वीवरील आपले स्वर्ग, एक असे ठिकाण जे पूर्वी खूप शांत आणि सुंदर वाटत होते. तिथे आता नरक समान परिस्थिती निर्माण झाली आहे. शहिदांसाठी शांती आणि न्यायासाठी प्रार्थना करत आहे.' पण लगेचच दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने तिच्या जुन्या काश्मीर ट्रिपचे फोटो टाकले यामध्ये ती रमणीय स्थळी फिरताना दिसत होती. या गोष्टीमुळे नेटकऱ्यांना तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

Sara Ali Khan Trolled
Imanvi Esmail: प्रभासच्या हिरोईनचे पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन, सोशल मीडियावरील अफवांना अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...
Sara Ali Khan Trolled
Sara Ali Khan TrolledSaam Tv

सोशल मीडियावर युजर्सनी तिच्यावर टीका करत म्हटले की, “जर खरंच दुःख वाटत आहे तर फक्त श्रद्धांजली द्या, फोटोंचं प्रदर्शन का?” काहींनी लिहिलं, “तुमच्या पोस्टमध्ये भावना नाहीत, केवळ पब्लिसिटी आहे.” अनेकांनी हेही म्हटले की अशा गंभीर प्रसंगी स्वतःच्या ट्रिपचे फोटो शेअर करणं हे असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. काही युजर्सनी तर थेट तिच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

Sara Ali Khan Trolled
Munawar Faruqui: खुदा माफ नहीं...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मुनव्वर फारूकी शायरीतून व्यक्त, बोचक शब्दात नेमकं काय म्हणाला? पाहा पोस्ट

या वादावर अद्याप सारा अली खानकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया वागणुकीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली कृती कधी कधी उलटसुलट परिणाम देऊ शकते, हे या प्रकरणातून अधोरेखित होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com