Imanvi Esmail: प्रभासच्या हिरोईनचे पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन, सोशल मीडियावरील अफवांना अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

Prabhas Fauji Actress Imanvi Esmail: दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी फौजी या चित्रपटातील अभिनेत्री इमानवी अलीने अलीकडेच तिच्या कुटुंबाच्या पाकिस्तानशी संबंध असल्याच्या अफवांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
Prabhas Fauji Actress Imanvi Esmail
Prabhas Fauji Actress Imanvi EsmailSaam Tv
Published On

Prabhas Fauji Actress Imanvi Esmail: दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी फौजी या चित्रपटातील अभिनेत्री इमानवी अलीने अलीकडेच तिच्या कुटुंबाच्या पाकिस्तानशी संबंध असल्याच्या अफवांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्याविषयी काही खोट्या बातम्या पसरवल्या जात असून, त्या तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर परिणाम करत असल्याने तिने अखेर मौन सोडले आहे.

इमानवीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. ती म्हणाली, 'गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझ्या कुटुंबावर अनेक खोटे आरोप लावले जात आहेत. आम्हाला पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे असे पसरवण्यात आपले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. माझं कुटुंब हे पूर्णपणे भारतीय आहे आणि आमचे या देशावर प्रेम आहे.मी कोणावरही टीका करत नाही, पण कृपया कोणतीही माहिती शेअर करण्याआधी ती खरी आहे की नाही, हे तपासा. सोशल मीडियावर जबाबदारीने वागणं आपलं कर्तव्य आहे.' तिच्या या पोस्टमुळे अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच उत्तर मिळाले आहे.

Prabhas Fauji Actress Imanvi Esmail
Karan Veer Mehra: बांट दिया इस धरती को...; पहलगाम हल्ल्यावरील 'बिग बॉस फेम करण वीर मेहराच्या कवितेने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

फौजी या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या इमानवीबद्दल अचानक उठलेल्या या अफवांनी अनेक चाहत्यांनाही संभ्रमात टाकले होते. विशेषतः ती प्रभाससारख्या सुपरस्टारसोबत काम करत असल्याने सोशल मीडियावर तिच्यावर लक्ष केंद्रीत झालं होतं. परंतु, या प्रसिद्धीबरोबरच गैरसमज आणि ट्रोलिंगलाही तिला सामोरं जावं लागलं. यामुळे ती म्हणाली, “लोक प्रसिद्धीच्या झोतात आले की त्यांच्याविरोधात निगेटिव्ह पीआर करणे ही आपल्याकडील वाईट गोष्ट आहे.

Prabhas Fauji Actress Imanvi Esmail
Alka Kubal: अलका कुबल 'वजनदार' भूमिकेतून पुन्हा रंगभूमीवर; २८ वर्षांनंतर करणार धमाकेदार पुनरागमन

इमानवी इस्माइल, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर देखील आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८८५ हजार फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. २०२० मध्ये, 'ताल' मधील 'रमता जोगी' गाण्यावरील तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला. आगामी प्रभास अभिनित फौजी या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com