
Karan Veer Mehra Post: 'बिग बॉस 18' चा विजेता करण वीर मेहराने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक भावनिक कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. या कवितेत त्याने "क्या अल्लाह ने ये सब लिखा था?" असा प्रश्न उपस्थित केला, यामुळे काही चाहत्यांनी ही पोस्ट हटवण्याची मागणी केली तर, काहींनी त्याच्या कवितेचा गहिरा अर्थ समजत त्याचे कौतुक केले आहे.
करण वीर मेहराने आपल्या कवितेत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मानवतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने लिहिले, बांट दिया इस धरती को,क्या चांद सितारों का होगा? नदियों को कुछ नाम दिए, बहती धारों का क्या होगा? शिव की गंगा भी पानी है,आबे जमजम भी पानी, पंडित भी पिए, मौला भी पिए। तो पानी का मज़हब क्या होगा? एक है सूरज, चांद है एक, एक हवा में सांस है सबकी, तो पूछो इन फिरकापरस्तों से क्या हवा भी नई चलाओगे? नस्लों का जो करे बंटवारा, रहबर वो कौम का ढोंगी है, सवाल तो बस एक ही है, क्या अल्लाह ने मंदिर तोड़ा था या राम ने मस्जिद तोड़ी है? बांट दिया इस धरती को, कोई हिंदू है, कोई मुसलमान, कोई सिख, कोई ईसाई, बस सबने इंसान ना होने की एक कसम खाई है।"या ओळींनी अनेकांच्या भावना दुखावल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली.
चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. काहींनी म्हटले की, "भाई, पोस्ट डिलीट कर दो," तर काहींनी त्याच्या या कवितेचे कौतुक कर ही कविता सध्याच्या सत्य स्थितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. पण, करण वीर मेहराने अद्याप या प्रतिक्रियांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या कवितेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी करण वीर मेहराच्या भावनात्मक अभिव्यक्तीचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्या शब्दांची निवड चुकल्याचे म्हटले. या प्रकरणामुळे सेलिब्रिटींनी संवेदनशील विषयांवर व्यक्त करताना अधिक जागरूक राहावे, अशी चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.