Shruti Kadam
सिंपल कॉटन (Cotton) कुर्ती उन्हाळ्यात त्वचेला मोकळेपणा आणि गारवा देते. प्रिंटेड किंवा साध्या रंगातील कुर्त्या रोजच्या वापरासाठी उत्तम आहे
स्टाईलसह फॉर्मल लूक हवा असेल तर कॉलर असलेल्या हलक्या कापडाच्या कुर्त्या घालाव्यात.
फ्लेयर असलेल्या सुटसुटीत कुर्ती उन्हाळ्यात आरामदायक असतात आणि त्याचबरोबर स्टायलिश दिसतात.
चिकनकारी एम्ब्रॉयडरी असलेल्या पांढऱ्या किंवा पेस्टल शेडमधील कुर्त्या उन्हाळ्यात खूप फ्रेश आणि एलिगंट लूक देतात.
शॉर्ट ट्युनिक प्रकारातील कुर्त्या जीन्स किंवा पलाझोसह मिक्स करून घालता येतात, ज्यामुळे आरामदायक आणि ट्रेंडी लुक मिळतो.
उन्हाच्या दिवसांत हलक्या रंगाच्या स्लीव्हलेस किंवा थ्री-क्वार्टर स्लीव्ह्स असलेल्या कुर्त्या अधिक चांगल्या वाटतात.
मिंट ग्रीन, बेबी पिंक, स्काय ब्लू असे थंड रंग उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देतात आणि फॅशन स्टेटमेंटही तयार करतात.