Vijay Varma  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Varma : तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर विजय वर्माने सोडलं मौन, चक्क रिलेशनशिपची आईस्क्रीमशी केली तुलना

Vijay Varma Talk About Relationship: विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या असताना, विजय वर्माने रिलेशनशिपबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma ) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. काही काळापूर्वी यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. यांनी इन्स्टाग्रामवरील एकमेकांचे फोटो देखील हटवले होते. ब्रेकअपच्या चर्चांनंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा रवीना टंडनच्या होळी पार्टीमध्ये स्पॉट झाले. ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना विजय वर्माने रिलेशनशिपबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

एका मिडिया मुलाखतीत विजय वर्माने आपले रिलेशनशिपबद्दलचे मत मांडले आहे. त्याने रिलेशनशिपची तुलना चक्क आईस्क्रीमशी केली आहे. मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला की, "रिलेशनशिपचा एखाद्या आईस्क्रीमप्रमाणे आस्वाद घ्या. म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी रहाल. आईस्क्रीममध्ये तुम्हाला कोणताही फ्लेवर मिळो, तो स्वीकारा आणि पुढे चला." विजय वर्माचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. दोघे कायम एकत्र स्पॉट होत होते. मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा ब्रेकअप झाला असून आता दोघांनी फक्त मैत्रीचे नाते ठेवले आहे. 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजपासून यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कालांतराने यांनी ते एकमेकांना डेट करत असल्याचे कबूल केले. ब्रेकअपच्या चर्चा सुरू होण्याआधी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा देखील सुरू होती.

तमन्ना भाटियाला 'स्त्री २'मधील 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तमन्ना भाटिया आता लवकरच 'ओडेला 2' मध्ये दिसणार आहे. अलिकडेच 29 नोव्हेंबर 2024ला तमन्ना भाटियाचा 'सिकंदर का मुकद्दर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर विजय वर्माची 'IC 814 -द कंदहार हायजॅक' सीरिज खूपच गाजली. विजय वर्मा आता लवकरच 'मटका किंग' वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT