Shreya Maskar
कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी शहाळ्याची मलई, शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, व्हिप क्रीम, कंडेन्स मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स इत्यादी साहित्य लागते.
कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात शहाळ्याची मलई, शहाळ्याचे पाणी आणि नारळाचे दूध ब्लेंड करून घ्या.
एका बाऊलमध्ये व्हिप क्रीम घेऊन चांगली फेटून घ्यावी.
व्हिप क्रीममध्ये कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स आणि शहाळ्याच मिश्रण एकत्र करावे.
शेवटी शहाळ्याचे तुकडे बारीक कापून मिश्रणात टाका.
हे मिश्रण ८ ते १० तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या.
अशाप्रकारे गारेगार कोकोनट आईस्क्रीम तयार झाला आहे.
तुम्ही कोकोनट आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रुट्सही घालू शकता.