Shreya Maskar
कॉफी मिल्कशेक बनवण्यासाठी थंड दूध, साखर, बर्फाचे तुकडे, कॉफी पावडर, चॉकलेट कुकीज आणि व्हॅनिला आईस्क्रीम इत्यादी साहित्य लागते.
कॉफी मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये चॉकलेट कुकीजची पावडर करून घ्या.
आता यात साखर, थंड दूध आणि कॉफी पावडर मिक्स करा.
ब्लेंडरमध्ये सर्व छान मिक्स करून घ्या.
आता यात व्हॅनिला आईस्क्रीम आणि बर्फाचे तुकडे घाला.
हे मिश्रण चांगले ब्लेंड झाल्यावर एका ग्लासात काढून घ्या.
मिल्कशेकची चव आणखी वाढवण्यासाठी त्यावर कुकीज पावडर आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाका.
तुम्ही मिल्कशेक अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.