Shreya Maskar
मटार करंजी बनवण्यासाठी मटार, बटाटा, मैदा, साजूक तूप आणि खोबऱ्याचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
मीठ, पाणी, आलं, हिरवी मिरची, तेल, हिंग, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
मटारची करंजी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मैद्याचे पीठ, मीठ, साजूक तूप आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
दुसऱ्या बाजूला हिरवे मटार, बटाटे, आलं, हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे मिक्सरला पेस्ट बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, हिरव्या मिरचीचे वाटण आणि हिरवे मटारची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या
आता यात जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, कोथिंबीर घालवून शिजवून घ्या.
कणकेच्या पुरी लाटून त्यात मटारचे सारण भरून करंजीला दुमडून घ्या.
मंद आचेवर मटार करंजी खरपूस तळून घ्या.