Chhava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhava: 'छावा' पाहिल्यानंतर चिमुरड्याने टाहो फोडला...; विकी कौशल व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ही आमची कमाई

Vicky Kaushal Reaction On Fan Cry After Watching Chhava: विकी कौशलच्या छावा चित्रपटाने सर्वांना वेड लावले आहे. हा चित्रपट बघून झाल्यावर एका लहान मुलाला अश्रू अनावर झाले होते.

Siddhi Hande

विकी कौशलचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल झाले आहेत. थिएटरमधील अेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक चाहते चित्रपट बघून रडताना दिसत आहे. नुकताच एका मुलाचा थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा मुलगा चित्रपट बघून झाल्यानंतर महाराजांना मानवंदना देताना दिसत आहे.यावेळी हा लहान मुलगा खूप रडत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील या चित्रपटाने अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अनेक लोक चित्रपटगृहात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावाने घोषणा देताना दिसतात. हा प्रत्येकासाठी खूप गर्वाचा क्षण आहे. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर एका लहान मुलाने टाहो फोडल्याचे दिसत आहे. स्वतः विकी कौशलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत एक लहान मुलगा छावा चित्रपट बघून झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देताना दिसत आहे. ' प्रौढ प्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावंस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज महाराज श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय' अशा शब्दात त्याने महाराजांचा जयजयकार केला आहे. ही घोषणा देताना या लहान मुलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत.

विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.त्यावर त्याने कॅप्शन दिलं आहे ती. हीच आमची सर्वात मोठी कमाई, मला तुझा गर्व आहे. मला तुला मिठी मारायची आहे. सर्वांच्या भावनांसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद. आज जे घडतंय तो सर्वात मोठा विजय आहे, असं त्याने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT