Viral Video: 'छावा'ची पडद्यावर डरकाळी, चित्रपटगृहात मानाचा मुजरा, ताईची शिवगर्जना ऐकून अंगावर शहारे येतील

Viral News Video: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपट पाहून काही लोक रडताना, तर काही छत्रपती संभाजी महाराजांचा वेश धारण करून चित्रपटगृहात आले असल्याचे दिसत आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवाजी महाराज यांचे शौर्य, धैर्य आणि नेतृत्व भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन होतात. याशिवाय, विकी कौशलचा 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे आणि तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर धूम मचवली आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्साह निर्माण केला असून, त्यावर चर्चा चालू आहे.

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटगृहातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक चित्रपट पाहून रडताना दिसत आहेत, तर काही छत्रपती संभाजी महाराजांचा वेश धारण करून आले आहेत. शिवगर्जना करणारे आणि भावुक झालेले दर्शक देखील या व्हिडिओंमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रभावामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणि भावना दिसून येत आहेत.

Viral Video
Viral Video: भारीच! युवकांना मागे टाकत लुंगी घालून काकांचा जबरदस्त डान्स; स्टेजवर डान्सचा धुरळा, पाहा VIDEO

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एका मुलीने थिएटरमध्ये शिवगर्जनाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, ज्याचा कॅप्शन आहे, "लक्ष्मी चित्र मंदिर कणकवली आवाज घुमला रणरागिणीचा." हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक भावुक होतात आणि त्याची लोकप्रियता वाढत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत.

Viral Video
Viral Video: हाहाहा...झोपलेल्या माणसावर माकडाचा हल्ला, पुढे काय घडले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा VIDEO

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ताई ऐक नंबर गर्जना तुला मना पासुन सलाम आहे, तर एका युजरने लिहिले, कोणीही मोबाईलवर फिल्म बघू नका कृपया चित्रपट गृहमध्ये जाऊन पाहा, आणखी एका युजरने लिहिले, काय प्रेम असेल या पोराचे महाराजांवर, आणखी एका युजरने लिहिले, कोटी कोटी प्रणाम छत्रपती शंभूराजे आपणांस ताई आपणांस मानाचा मुजरा.

Viral Video
Indian Railways: कौतुकास्पद! रेल्वेत चढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा वाचला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com