Indian Railways: कौतुकास्पद! रेल्वेत चढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा वाचला जीव

Andheri Railway Station: अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८वर आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षक पाहुप सिंग यांनी एका प्रवाशाचा धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवला, अशी एक महत्त्वाची घटना घडली आहे.
Railway Station
Railway Station
Published On

अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८वर एक धाडसी बचावाची घटना घडली आहे. ज्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सहाय्यक उपनिरीक्षक पाहुप सिंग यांनी एका प्रवाशाचा जीव वाचवला. लोकशक्ती एक्सप्रेस ट्रेनने प्लॅटफॉर्म क्रमांक ८ सोडताच, एका प्रवाशाने धावत धावत चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या प्रयत्नात तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दरम्यान असलेल्या गॅपमध्ये पडला.

लोकशक्ती एक्सप्रेस अंधेरी स्टेशन सोडताना प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर एक घटना घडली. सेव्हन बंगलो परिसरातील राजेंद्र मांगीलाल (४०) चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची पकड सुटल्याने तो प्लॅटफॉर्मवर पडला आणि ट्रेन व प्लॅटफॉर्म दरम्यानच्या रिकाम्या जागेत अडकला. यातून त्याला आरपीएफ जवानांनी तत्परतेने वाचवले.

Railway Station
Viral Video: भारीच! युवकांना मागे टाकत लुंगी घालून काकांचा जबरदस्त डान्स; स्टेजवर डान्सचा धुरळा, पाहा VIDEO

या घटनेत तत्परतेने हस्तक्षेप करत, आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक पाहुप सिंग यांचे कर्तव्य पार पाडले. त्यांनी धाडस दाखवत त्यांना ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान असलेल्या गॅपमधून बाहेर काढले आणि गंभीर अपघात टाळला. सिंग यांच्या साहसामुळे राजेंद्रचा जीव वाचला. याप्रकरणानंतर, राजेंद्रला अरवली एक्सप्रेसने अहमदाबादला पाठवण्यात आले. या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कारवाईमुळे सिंग यांनी नवा आदर्श निर्माण केला असून, स्थानकावर उपस्थित लोकांचे कौतुक प्राप्त केले.

Railway Station
Crime News: महाड येथे तीन तलाकविरोधात पहिला गुन्हा दाखल, पतीसह सासरच्यांवर पोलिसांची कारवाई

या घटनेने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचे किंवा उतरण्याचे धोके पुन्हा एकदा उघड केले आहेत. रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत असते, परंतु अनेक लोक घाईघाईत धोकादायक पावले उचलतात. अशा प्रकारच्या अपघातांना टाळण्यासाठी प्रवाशांनी ट्रेन पूर्णपणे थांबल्यानंतरच चढणे किंवा उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Railway Station
Viral Video: गिफ्ट देणं पडलं महागात! गर्लफ्रेंडला आलिशान गाडी भेट दिली मात्र पुढे जे घडलं ते भयंकर...व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com