
व्हॅलेंटाईन डे नुकताच पार पडला, आणि प्रेमीयुगुलांसाठी हा खास दिवस गिफ्ट्सशिवाय अपूर्ण असतो. अनेकांना आपल्या पार्टनरकडून मिळणाऱ्या गिफ्टची उत्सुकता लागलेली असते. मात्र, एका कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, कारण या तरुणीने बॉयफ्रेंडकडून गिफ्ट स्वीकारल्यानंतर अनपेक्षितपणे त्याला थोबाडीत मारली! नेमकं तिनं असं का केलं, हे कळलेलं नाही, पण हा प्रकार पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, या घटनेवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
त्या व्यक्तीने प्रेमभरल्या अंदाजात आपल्या गर्लफ्रेंडचे डोळे झाकले आणि तिला हळूहळू एका ठिकाणी नेले. तेथे समोर एक आलिशान लाल रंगाची नवीकोरी कार उभी होती, ज्यावर हार्टच्या आकाराचे सुंदर फुगे लावले होते. कार पाहताच तरुणी आनंदाने चमकली. तिने उत्साहाने आधी कारला मिठी मारली आणि नंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच गुलाबाच्या पाकळ्या बाहेर पडल्या, आणि फुगे हवेत उडाले. हा रोमँटिक क्षण पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गिफ्ट पाहून भारावलेल्या तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला आनंदाने मिठी मारली. मात्र, खरी सरप्राईज अजून बाकी होती! कारच्या शेजारी एक लाल रंगाची सायकल ठेवलेली होती. बॉयफ्रेंडने उत्साहाने सांगितलं, "ही सायकल तुझ्यासाठी आणि ही गाडी माझ्यासाठी, कारण मी स्वतःवर खूप प्रेम करतो." हे ऐकताच गर्लफ्रेंडचा मूड अचानक बदलला आणि तिने त्याला थेट थोबाडीत मारलं. हा अनपेक्षित ट्विस्ट असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एक तरुण आणि त्याच्या सोबत असलेली सुंदर तरुणी दिसत आहे. विशेष म्हणजे, व्हॅलेंटाईन डे असल्याने तिने आकर्षक लाल रंगाचा ड्रेस घातला आहे, जो तिच्या लूकला अधिक खुलवत आहे. या कपलमधील केमिस्ट्री पाहता, ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या खास क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या कपलचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.