Viral Video: अर्रर्र...आजीबाईंनी थेट ट्रेनच्या खिडकीतून केली आत एन्ट्री, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

Viral Video In Train: सध्या सोशल मीडियावर एका अम्माचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्या ट्रेनमध्ये चढताना दिसतात. या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले असून, पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

महाकुंभ मेळा सध्या सुरू असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नानासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर महाकुंभाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर आतापर्यंत या मेळ्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

कधी भाविकांची गर्दी, तर कधी ट्रेनमधील अफाट संख्येने प्रवास करणाऱ्या लोकांचे दृश्य. सध्या व्हायरल होणारा एक व्हिडिओ महाकुंभासाठी जाणाऱ्या ट्रेनशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि त्यात आधीच मोठी गर्दी दिसत आहे.

Viral Video
Viral Video: पाहावं ते नवलचं! पठ्ठ्याने घरातील फॅनला असं काय केलं की VIDEO पाहून नेटकरीही म्हणाले...

विशेष म्हणजे, एक आजी नेहमीच्या दरवाज्यातून नव्हे, तर थेट आपत्कालीन खिडकीतून आत चढताना दिसतात. कोणाच्याही मदतीशिवाय सहजपणे चढणाऱ्या या आजींचे फिटनेस पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत माहिती नाही, पण कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'संपूर्ण रेल्वे आजीला घाबरली आहे. इन्स्टाग्रामवर 'shivajirastogi' नावाच्या अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Viral Video
Viral Video: मोनालिसाची जादू, ३५ वर्ष जुन्या गाण्यावर दिले एक्सप्रेशन; VIDEO पाहून चाहते झाले फिदा

हजारो लोकांनी व्हिडीओ पाहिला होता आणि अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या. एका युजरने लिहिले, आजीला २१ तोफांची सलामी द्यायला हवी. तर दुसऱ्याने म्हटले, काहीही झाले तरी आपण कुंभमेळ्यात जाऊन स्नान करणार जय हो गंगा माई की. तिसऱ्याने लिहिले, तो माझ्यापेक्षा जास्त तंदुरुस्त आहे. तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, रेल्वे मंत्रालय खिडकी थोडी मोठी करण्याचा विचार करत आहे.

Viral Video
Viral Video: अरे देवा! काकांनी ट्रेनमध्ये झोपण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com