Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava : 'आया रे तुफान...' गाण्यात दिसली 'या' मराठी कलाकारांची झलक, 'छावा'साठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

Toofan Song : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'छावा' (Chhaava) चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'छावा' चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच 'छावा' चित्रपटाचे 'आया रे तुफान' (Toofan Song) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे. या गाण्यात राज्याभिषेक सोहळ्याचे क्षण दाखवण्यात आले आहे. या गाण्यात अनेक मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे.

'छावा' चित्रपटातील मराठी कलाकार

  • संतोष जुवेकर

  • सुव्रत जोशी

  • सारंग साठ्ये

  • आशिष पाथोडे

  • शुभंकर एकबोटे

  • नीलकांती पाटेकर

  • किरण करमरकर

'छावा' चित्रपटात 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. महाराजांच्या दरबारात सुव्रत जोशी, आशिष पाथोडे,किरण करमरकर आणि सारंग साठ्ये पाहायला मिळाले. 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' गाण्यामध्ये शुभंकर एकबोटे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर हे कलाकार पाहायला मिळाले.

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. तर चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून ए आर रेहमान यांनी केले आहे. 'आया रे तुफान' हे गाणे मराठी गायिका वैशाली सामंतने गायले आहे. तिच्या आवाजाचे चाहते दिवाने झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT