Santosh Juvekar : 'राजे एकटे आहेत'; 'छावा' चित्रपटातील प्रसंग सांगताना संतोष जुवेकर भावुक

Chhaava Movie Santosh Juvekar: 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठमोळे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
Chhaava Movie Santosh Juvekar
Chhaava Movie Santosh Juvekarsaam Tv
Published On

Chhaava Movie : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'छावा' (Chhaava) चित्रपटाची चर्चा सुरु आहेत. चाहाते आतुरतेने 'छावा' चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक वाद-विवाद सुरू झाले होते. मात्र तरी देखील प्रेक्षक चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. 'छावा' चित्रपटात हिंदीसह अनेक मराठी कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत त्यातील एक म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने या चित्रपटातील त्याची एक भावनिक आठवण सांगितली आहे.

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्याने चित्रपटात रायाजींची भूमिका साकारली आहे. राजश्री मराठीने घेतलेल्या मुलाखतीत संतोषने या चित्रपटातील एक भावनिक प्रसंग सांगितला आणि यावेळी तो प्रसंग आठवून संतोषला अश्रू अनावर झाले. हा त्याच्या व्हिडीओ झपाट्याने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Chhaava Movie Santosh Juvekar
Sky Force Vs Deva Box Office: 'स्काय फोर्स'समोर 'देवा'ची जादू फेल; पाचव्या दिवशी शाहिदच्या चित्रपटाने केली इतकीच कमाई

संतोष म्हणाला, मी जास्त काही सांगू शकणार नाही पण, चित्रपटात एक प्रसंग आहे जेव्हा रायाजींचा काळ जवळ आलेला असतो. आणि ते पाहतात की माझ्यानंतर आता राजे एकट आहेत. हा प्रसंग करताना मी खूप रडलो. कारण तो सीन सुरु असताना मला जाणवल की खरचं राजे एकटे होते. असे बोलता संतोषला अश्रू अनावर झाले.

Chhaava Movie Santosh Juvekar
Abhishek Bachchan Net Worth: ज्युनियर बच्चन आहे करोडोंचा मालक; चित्रपटांव्यतिरिक्त 'या' कामातून करतो भरघोस कमाई

मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या चित्रपटात संतोष जुवेकर व्यतिरिक्त सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, आस्ताद काळे, मनोज कोल्हटकर, शुभंकर ऐकबोटे, किरण करमरकर आणि नीलकांती पाटेकर आदी मराठी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com