
Abhishek Bachchan Birthday : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. २००० मध्ये 'रेफ्यूजी' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, अभिषेक बच्चनच्या कामाचे खूप कौतुक झाले.
यानंतरही अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. एकीकडे त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. तर अनेक चित्रपटांमधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. यामध्ये त्याचा 'गुरू, पा' 'धूम' आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला 'वॉन्ट टू टॉक' आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आज अभिषेक त्याच्या ४९ व्या वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने, त्याच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया.
अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती किती आहे?
अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, GQ च्या अहवालानुसार, अभिनेत्याकडे २८० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय, तो अनेक ब्रँड आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. एवढेच नाही तर अभिषेक बच्चन हा प्रो कबड्डी लीग फ्रँचायझी संघ जयपूर पिंक पँथर्सचा मालक देखील आहे आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली एबी कॉर्प हे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
अभिषेक बच्चनची मालमत्ता
अभिषेक बच्चन रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतो. २०२० ते २०२४ या काळात त्याने वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत २२० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. याशिवाय, रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच अभिनेत्याने २४.९५ कोटी रुपयांना १० अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या आहेत
अभिषेक बच्चनने 'तेरा जादू चल गया', 'देश', 'हां मैंने भी प्यार किया', 'शरारत', 'मुंबई से आया मेरा दोस्त', 'कुछ ना कहो', 'जमीन', 'रन', 'युवा', 'धूम', 'रक्त', 'नाच', 'सरकार', 'बंटी और बबली', 'दस', 'सलाम नमस्ते', 'कभी अलविदा ना कहना', 'उमराव जान' अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय, अभिनेता शेवटचा 'आय वॉन्ट टू टॉक' मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने अर्जुनची भूमिका साकारली होती. आता अभिषेक बच्चन लवकरच 'हाऊसफुल ५' आणि ओटीटी चित्रपट 'बी हॅपी'मध्ये दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.