Alka Yagnik SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित; चालताना घ्यावा लागला आधार, 'तो' VIDEO पाहून चाहते चिंतेत

Alka Yagnik Honoured With Padma Bhushan : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञनिक यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांना चालण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत आहे, यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

गायिका अलका याज्ञनिक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला

गायिकेच्या तब्येतीसाठी चाहते चिंतेत

अलका याज्ञनिक यांना चालण्यासाठी घ्यावी लागली मदत

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात २३ जून रोजी आयोजित दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गायिका अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकीकडे अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे चाहते आनंदी आहेत, तर दुसरीकडे चाहत्यांनी गायिकेच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की, पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी अलका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. जेव्हा त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत होत्या, तेव्हा गायिका एका परिचारिकेचा आधार घेऊन चालताना दिसली. त्या आनंदी होत्या पण कुठे तरी थकल्यासारख्या, अशक्त वाटल्या. त्याच्या या व्हिडीओमुळे चाहते चिंतेत पडले आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

चाहते व्हिडीओवर कमेंट करत त्यांची तब्येतीची विचारपूस करत आहते. एका युजरने विचारले की, "त्यांची तब्येत बरी नाही का?" दुसऱ्या युझरने लिहिले, "त्या आधाराने का चालत आहेत?" तिसरा एका युझरने लिहिले, "अलका याज्ञिक यांना नक्की झाले काय? त्यांची तब्येत ठीक नाही वाटत..."

अलका याज्ञिक यांचा लूक

अलका याज्ञिक यांनी पुरस्कार सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता. फिकट रंगाच्या सूट त्यांनी परिधान केला होता. हातात बांगड्या, बोटात अंगठ्या, कपाळावर टिकली, हलका मेकअप करून त्याने लूक पूर्ण केला.

अलका याज्ञिक यांना झाले काय?

मीडिया रिपोर्टनुसार, अलका याज्ञिक यांना सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस नावाचा एक दुर्मिळ आजार झाला आहे. हा श्रवणदोषाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो कानाच्या आतील भागाला किंवा मेंदूपर्यंत आवाज पोहोचवणाऱ्या चेतांना झालेल्या नुकसानीमुळे होतो.

अलका याज्ञिक कारकीर्द

अलका याज्ञिक यांनी आपल्या गोड आवाजाने जगाला वेड लावले आहे. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत गाणी गायली आहेत. त्यांनी १९९० आणि २००० च्या दशक त्यांनी आपल्या गाण्याने गाजवले आहे. 'चोरी चोरी चुपके चुपके', 'आये हो मेरी जिंदगी में', 'गली में आज चांद निकला' आणि 'तू शायर है मैं तेरी शायरी' ही त्यांची काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT