Alka Yagnik: ट्रेनमध्ये पहिली भेट, लग्नाचा निर्णय; आज राहतात पतीपासून दूर; कोण आहेत अलका याज्ञिक यांचे पती?

Alka Yagnik Lovestory: गायिका अलका याज्ञिक चर्चेत आल्या आहे. अलका यांना सेन्सरी नर्व्ब हिअरिंग लॉस नावाचा आजार झाला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार कोणाला माहित नाहीये. आज आम्ही तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी सांगणार आहे.
Alka Yagnik Lovestory:
Alka Yagnik Lovestory:Saam Tv
Published On

गायिका अलका याज्ञिक सध्या चर्चेत आहेत. अलका याज्ञिक यांना एका दुर्मिळ आजाराचे निदान झाले आहे. कानात हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यांना सेन्सरी नर्व्ब हिअरिंग लॉस नावाचा आजार झाला आहे. त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अलका या मागील ४० वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातात. त्यांनी आतापर्यंत १६ पेक्षा जास्त भाषेत गाणी गायली आहेत. त्यांनी नव्वदच्या दशकात आपल्या आवाजाने अनेकांची मने जिंकली होती. अलका याज्ञिक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना फार काही माहित नाहीये. अलका यांची लव्ह स्टोरी खूच हटके आहे. जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल.

अलका यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी गुजराती कुटुंबात झाला होता. अलका यांचे नीरज कपूर यांच्याशी लग्न झाले आहे. नीरज कपूर हे बिझनेसमॅन आहे. नीरज आणि अलका यांची पहिली भेट ट्रेनमध्ये झाली होती. वैष्णवदेवीला जाताना हे दोघे एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. अलका आणि नीरज दोघेही वेगवेगळ्या शहरात काम करत होते. त्यामुळे त्यांचे पुढे जाऊन एकमेकांना भेटणे होईल का, असे अनेक प्रश्न कुटुंबियांना पडले होते. त्यामुळे कुटुबियांना त्यांना सावधदेखील केले होते. परंतु त्यांनी १९८९ मध्ये लग्न केले. परंतु लग्नानंतर मात्र त्यांना वेगळं रहावे लागले.

अलका या कामासाठी मुंबईत राहतात. तर नीरज हे शिलाँगला राहायचे. ते दोघेही अनेकादा भेटायचे. परंतु लग्नानंतरही हे असंच सुरु राहिलं. त्या दोघांनीही कामासाठी वेगवेगळ्या शहरात राहण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना सायशा नावाची मुलगी आहे. दोघेही लांब राहून आपला संसार करत आहेत.

Alka Yagnik Lovestory:
Kiran Mane Post: 'गृहमंत्री महोदय खुर्ची सोडा, राजीनामा द्या', वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या, किरण माने संतापले

लहानपणापासूनच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार होत गेले. त्यांनी वयाच्या ६ वर्षापासूनच गाणी गायला सुरुवात केली. त्यांनी आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओवर गाण्यास सुरुवात केली. त्यानंतर १० वर्षाची असताना त्या मुंबईत आल्या. त्यानंतर त्यांच्या करिअला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. राज कपूर यांनी अलका यांना दिग्दर्शक लक्ष्मीकांत यांच्याकडे पाठवले. त्यानंतर त्यांनी अलका यांना गायची संधी दिली.

Alka Yagnik Lovestory:
Deepika Padukone: आलिया, प्रियांकाला मागे टाकत दीपिका ठरली २०२४ ची सर्वात महागडी अभिनेत्री; एका चित्रपटासाठी घेते इतक्या कोटींचे मानधन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com