Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sikander Bharti Passed Away : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे.
Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sikander Bharti Passed AwaySaam Tv
Published On

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सिकंदर भारती यांचे निधन २४ मे रोजी झाले आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा काय झाला? अद्याप हे कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा

बॉलिवूड सिनेदिग्दर्शक सिकंदर भारती यांच्या पार्थिवावर आज (२५ मे) सकाळी ११ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार होता.

Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Juhi Parmar : वयाच्या १७ व्या वर्षीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली कास्टिंग काऊचची शिकार, स्वत:च केला खुलासा

‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ यांसारख्या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन सिकंदर भारती यांनी केलेले आहे. सिकंदर यांनी राजेश खन्ना, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Cannes Festival 2024 मध्ये छाया कदम यांना Standing Ovation, क्षण पाहून अभिनेत्रीला गहिवरून आलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com