Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा

Amruta Khanvilkar Shared Mumbai Police Post : संजय लीला भन्साली यांची 'हिरामंडी' वेबसीरिजमधील एका डायलॉगचा वापर करत मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास संदेश दिलाय. मुंबई पोलिसांची ही पोस्ट अमृता खानविलकरने रिपोस्ट केली आहे.
Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा
Amruta Khanvilkar Shared Mumbai Police PostSaam Tv

ओटीटीवरील कंटेंट पाहण्यासाठी दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. ओटीटीवरील चित्रपटांची आणि वेबसीरीजची कायमच जोरदार चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय लीला भन्साली यांची 'हिरामंडी' वेबसीरीज रिलीज झाली. या वेबसीरिजमधील एका डायलॉगचा वापर करत मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास संदेश दिलाय. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केलेली आहे. मुंबई पोलिसांची ही इन्स्टा पोस्ट अमृता खानविलकरने रिपोस्ट शेअर केली आहे.

Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा
Juhi Parmar : वयाच्या १७ व्या वर्षीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली कास्टिंग काऊचची शिकार, स्वत:च केला खुलासा

मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "एक बार देख लिजिये, दिवाना बना दिजीये, चलन काटने के लिए, तैय्यार है हम, तो हेल्मेट पेहेन लिजिये" पुढच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "पुराने पासवर्ड दोहरे नहीं जाते, भुला दिए जाते है", "ओटीपी बताने और बर्बाद होने के बीच मैं कोई फरक नहीं होता !"

अमृताने इन्स्टा स्टोरी शेअर करत मिश्किलपणे मुंबई पोलीस आणि त्यांचा भन्नाट क्रिएटिव्हच कौतुक केलं आहे. "मुंबई पोलिस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये" अस खास कॅप्शन देत तिने मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी 24/7 काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कायमच नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी, काळजी घेण्यासाठी ते त्यांना आव्हान करत असतात. मुंबई पोलिसांनी एकदम फिल्मी स्टाईलमध्ये नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आव्हानं केल्यामुळे मुंबई पोलिसांची जोरदार चर्चा होत आहे.

Amruta Khanvilkar Post
Amruta Khanvilkar Shared Mumbai Police PostInstagram
Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा
Cannes Festival 2024 मध्ये छाया कदम यांना Standing Ovation, क्षण पाहून अभिनेत्रीला गहिवरून आलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com