
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. एकनाथ चिटणीस यांचे १०० व्या वर्षी बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या डॉ. चिटणीसांनी अखेर श्वास सोडला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.
डॉ. चिटणीस यांचा इस्रोच्या भारतीय अवकाश संशोधन संस्था जडणघडणीत अत्यंत मोलाचा सहभाग होता. १९७० च्या दशकापासून त्यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी देशाच्या पहिल्या दूरसंचार उपग्रह ‘इन्सॅट’च्या निर्मितीत, खेडोपाडी टीव्ही पोहोचवण्यासाठी साईट प्रयोगांमध्ये आणि थुंबा व श्रीहरिकोटा या रॉकेट प्रक्षेपण केंद्रांच्या जागांची निवड करण्यात निर्णायक भूमिका घेतली.
त्यांच्या नेतृत्वाखाली, स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे विकासकार्य आणि अवकाश संबंधित प्रयोग यशस्वीपणे पार पडले. तसेच, डॉ. चिटणीस यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) अध्यक्ष म्हणूनही कार्य केले आणि माध्यमांमार्फत देशभरातील विज्ञान व तंत्रज्ञान प्रसारात योगदान दिले. डॉ. चिटणीस यांना पद्मभूषणसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यांच्या आयुष्यातील कार्याचा ठळक ठसा भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिसून येतो. त्यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमाला जागतिक पातळीवर पोहोचवण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या निधनाने इस्रो आणि संपूर्ण देशातील विज्ञान क्षेत्रात एक मोठी रिक्तता निर्माण झाली आहे. डॉ. चिटणीस यांची कार्यशैली, दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्व नेहमीच पुढील पिढीच्या शास्त्रज्ञांसाठी प्रेरणास्त्रोत राहील. त्यांच्या योगदानामुळे भारताने अवकाश संशोधन आणि दूरसंचार क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.