Smita Patil: उत्कृष्ट अभिनय शैली, नैसर्गिक अभिनयाचा गुण आणि सौंदर्याची खान अशी ओळख सौंदर्यवती अभिनेत्री स्मिता पाटील यांची. स्मिता यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ८०च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवली होती. स्मिता यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अन्य भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारत दबदबा निर्माण केला होता. अभिनेत्री स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला. १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिताचे निधन झाले.
बऱ्याचदा अभिनेत्री म्हटल्यावर त्यांचा ग्लॅमरस मेकअप, कॅमेऱ्यासमोर स्वत:चे सादरीकरण असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.परंतू यासर्वांपासून स्मिता पाटील फार लांब होत्या. एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिताने आपली ओळख सौंदर्यानेच निर्माण केली होती. स्मिता आपला मेकअप स्वत:च करायच्या, असे त्यांचे मेकअप आर्टिस्टने दिपक यांनी सांगितले. स्मिता या अस्सल पुणेरीच. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झाले होते.
स्मिता यांनी चित्रपटसृष्टीत वयाच्या २०व्या वर्षी पदार्पण केले होते. त्यांनी आयुष्याच्या छोट्या प्रवासात ७० ते ८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटातील भूमिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांच्याकडे असणाऱ्या सौंदर्याने कधीच मेकअप केला नाही.
स्मिता पाटील यांचे मेकअप आर्टिस्ट दिपक सावंत यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मेकअपबद्दल भाष्य केले होते. त्या दरम्यान त्यांनी सांगितले की, स्मिता पाटील यांचा आणि मेकअपचा कधीच संबंध नसायचा. त्यांनी कलात्मक चित्रपटातून व्यावसायिक चित्रपटात पदार्पण केल्याने त्यांना मेकअप करायला लागायचा. दिपक सावंत यांनी १९८२ मध्ये 'भीगी पलके' चित्रपटात स्मिता पाटील यांचा पहिला मेकअप केला होता.
प्रत्येक कलाकाराची एक खास शैली असते. स्मिताचे डोळे फारच बोलके असल्याने त्या खास डोळ्याने अभिनय करायच्या. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या ही फारच होती. त्यावेळी अभिनेत्रींना चित्रपटात मेकअप करणं आणि सुंदर दिसणं महत्वाचे होते. स्मिताला गोरं करण्यासाठी बरेच कष्ट लागायचे. एकदा मी तिच्या मेकअपमध्ये पिवळा रंग मिक्स केला आणि त्यानंतर तिचा मेकअप केला. यामुळे त्या मेकअपनंतर ती खुपच सुंदर दिसू लागली होती.
मेकअपची खास आवड नसल्याने स्वत:चा मेकअप त्या स्वत:च करायच्या. संपूर्ण चित्रपटसृष्टीत मेकअपसाठी निरुत्साही असलेली अभिनेत्री म्हणून स्मिता या कदाचित एकमेव अभिनेत्री होत्या. दिपकने स्मिता यांना कुठेही प्रवासात असताना सहज मेकअप करु शकणारी कीट दिली होती. स्मिता पार्टीत जाताना आणि कमी बजेट असणाऱ्या चित्रपटात त्या स्वत: मेकअप करायच्या.
गोविंद निहलानीच्या ‘अर्ध सत्य’ चित्रपटाचे बजेट कमी होते. मेकअपमनमुळे चित्रपटाचा बजेट वाढणार होता. स्मिता पाटील यांना निहलानी यांची चिंता समजली. तेव्हापासून स्मिता यांनी स्वतः मेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी दीपक यांनी त्यांना मेकअप कसा करावा याचे प्रशिक्षण देत मेकअप किटही दिली होती.
सर्वांच्या विरोधात जाऊन राज आणि स्मिता या दोघांनी लग्न केले. मात्र त्यांचा सुखी संसार काही दिवसांतच विस्कटला. लग्नानंतर स्मिता लगेचच प्रेग्नंट (Pregnant) राहिल्या होत्या. २८ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांनी मुलाला म्हणजेच प्रतीक बब्बरला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर उद्भवलेल्या कॉम्लिकेशनमुळे त्यांचे निधन झाले. या आजाराने खुप कमी वयात त्यांनी जगाचा निरो घेतला. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.