Smita Patil: स्मिता पाटील यांना करायचा होता झोपून मेकअप, अखेर निधनानंतर झाली इच्छा पूर्ण

अभिनेते राज कुमार यांना पाहून स्मिता यांनी झोपून मेकअप करण्याचा आग्रह धरला होता.
Smita Patil Death Anniversary
Smita Patil Death AnniversarySaam Tv
Published On

Smita Patil Death Anniversary: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील या भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यात नेहमीच असतील. आजच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेत्रीने स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. अगदी कमी वयातच स्मिता हे जग सोडून गेल्या.

मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. बाळाच्या जन्माच्या वेळी उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशनमुळे स्मिता यांचा मृत्यू झाला. पण, त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांचा असाच एक किस्सा आहे, जेव्हा त्यांनी झोपून मेकअप करण्याचा आग्रह धरला होता. स्मिता पाटील यांनी अभिनेता राज कुमार यांना पाहून हा आग्रह धरला होता. चला तर जाणून घेऊया स्मिता पाटील यांचा हा किस्सा...

Smita Patil Death Anniversary
Ram Charan: दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरी १० वर्षांनी गुड न्यूज; लवकरच दुुडुदुडु धावणार पावलं...

बॉलिवूडमधीच्या ग्लॅमर आणि झगमगाटापासून दूर राहिलेल्या स्मिता यांनी त्यांच्या अभिनयाने स्वत:ची ओळख बनवली होती. त्या 'गलियों का बादशाह' या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. स्मिता व्यतिरिक्त या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, राज कुमार आणि डॅनी सारखे स्टार्स देखील होते. शूटिंगदरम्यान जेव्हा त्या मेकअप रूममध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी अभिनेते राज कुमार मेकअप करताना दिसले. राज कुमार झोपून मेकअप करत होते. हे पाहून स्मिता आश्चर्यचकित झाल्या, कारण याआधी त्यांनी कोणालाही असे झोपून मेकअप करताना पाहिले नव्हते.

राज कुमार यांना झोपून मेकअप करताना पाहिल्यानंतर त्या त्यांच्या मेकअप रूममध्ये आल्या आणि मेकअप मॅन दीपक सावंतला म्हणाल्या की मलाही झोपून मेकअप करायचं आहे. यावर दीपक सावंत यांनी नकार देत असे पडून मेकअप करता येत नसल्याचे सांगितले. यावर स्मिताने सांगितले की, 'राज कुमार झोपून मेकअप करतात'. हे ऐकून दीपक म्हणाले, 'ते राजकुमार आहेत, त्यांना पाहिजे ते करतील.' दीपक यांनी स्मिता यांना विनंती केली की झोपून मेकअप केल्याने तो खराब होईल आणि मला त्रास होईल. दीपक यांनी समजावून सांगितल्यावर स्मिता बसून मेकअप करून घ्यायला तयार झाल्या.

'गलियों के बादशाह' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये स्मिता पाटील यांची झोपून मेकअप करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. पण, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी स्मिता यांना नवरीसारखे सजविण्यात आले होते. मरणापूर्वी स्मिता म्हणाल्या होत्या की, 'मी मरेन तेव्हा मला नवरीप्रमाणे तयार करा' आणि तसेच घडले. स्मिता यांचा मृत्यू 13 डिसेंबर 1986 रोजी झाला. तेव्हा त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांना वधूप्रमाणे सजवले होते. तसेच त्यांचा मेकअप सुद्धा झोपून करण्यात आला होता. स्मिता यांचा त्यादिवशीचा मेकअप, मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी केला होता, ज्यांच्याकडे स्मिता यांनी झोपून मेकअप करण्याचा हट्ट केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com