Dharashiv Accident: लातूर-तुळजापूर महामार्गावर विचित्र अपघात; 3 अलीशान कार एकमेकांना धडकल्या, 3 जणांचा जागीच मृत्यू

Dharashiv Accident News: धाराशिव - लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला अशून ४ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Dharashiv Accident  News:
HORRIFIC ACCIDENT ON LATUR–TULJAPUR HIGHWAY: THREE DEAD IN TRIPLE CAR COLLISIONsaam tv
Published On
Summary
  • जखमींना धाराशिव व सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • करजखेडा पाटीजवळ घडली अपघाताची घटना

  • लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात

धाराशिव-लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर धडकून झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तिन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला असून महामार्गावर रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळत आहे.

Dharashiv Accident  News:
Dharashiv News : धाराशिव हादरलं! पुलाखाली पाण्यात आढळले ३ मृतदेह; अपघात की घातपात?

करजखेडा पाटीजवळ झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ कार आली असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरील वॅगनार कारला धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो गाडी पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून पलीकडील लेनमध्ये गेली. या लेनवरून येणाऱ्या होंडा सिटी कारला बोलेरोवर जोरात आदळली. या तिहेरी धडकेत तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

Dharashiv Accident  News:
Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. अपघातातील चार जण गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने उपचारासाठी धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघात घडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com