Veen Doghantali Hi Tutena Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena Video : तिच्या मनातलं प्रेम ओठांवर येण्याआधीच...; 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट, समर-स्वानंदीच्या नात्याचं पुढे काय होणार?

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदी विरोधात घरात कट कारस्थान रचताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये स्वानंदी ढसाढसा रडताना दिसत आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक वळण

स्वानंदी ढसाढसा रडते

स्वानंदी विरुद्ध कट कारस्थान रचले जात आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. अंशुमनच्या लग्नानंतर घरात एकामागोमाग एक वादळ येताना दिसत आहे. सध्या मालिकेत अंशुमन आणि सुष्मिताच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पाहायला मिळत आहे. मात्र अंशुमन चालाखीने या कार्यक्रमात गोंधळ घालतो. अंशुमन स्वानंदीने रिसेप्शनसाठी सुष्मिताला दिलेली साडी बदलतो आणि त्याऐवजी एक वेस्टर्न ड्रेस तिकडे ठेवतो, जे घालून सुष्मिता रिसेप्शनला येते, सर्वजण पाहतच राहतात.

सुष्मिता सर्वांना सांगते की हा ड्रेस मला स्वानंदीनेच रिसेप्शनसाठी दिला आहे. मात्र स्वानंदी हे ऐकताच थक्क होते. तिला काही समजत नाही की साडीच्या ठिकाणी हा वेस्टर्न ड्रेस कुठून येतो. लांब उभा राहून अंशुमन स्वानंदीची मजा घेत राहतो. घरातील सर्व प्रकार पाहून सदस्य स्वानंदीला खूप बोलतात. मात्र तिला काहीच समजत नाही. त्यानंतर 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात स्वानंदी ढसाढसा रडताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समर आणि स्वानंदी रुममध्ये एकत्र बसलेले असतात. तेव्हा स्वानंदी ढसाढसा रडत असते. तिला रडताना पाहून समर अस्वस्थ होतो आणि स्वानंदीला समजावतो. स्वानंदी म्हणते की, "मला माफ करा माझ्याकडे पुरावा नाही आहेतुम्हाला द्यायला...पण मी साडीच दिली होती..." त्यावर समर म्हणतो की, "माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे...तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही आहे..." त्यानंतर समर स्वानंदीला शांत राहण्यास सांगतो. तिला पाणी देतो, तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तसेच तिचा हात हातात घेऊन बसतो. हे सर्व पाहून स्वानंदी भारावून जाते. समर स्वानंदीचे डोळे पुसतो आणि तिच्याशी बोलतो.

झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "तिच्या मनात फुललेलं प्रेम ओठांवर आलं नाही, त्याच्या नजरेतलं प्रेम तिच्यापासून लपलं नाही!" समर -स्वानंदीच्या नात्यात प्रेम खुलताना दिसत आहे. या प्रोमोवर प्रेक्षक भरभरून कमेंट करत आहेत. तसेच समर-स्वानंदीच्या जोडीचे कौतुक करत आहे. तेजश्री प्रधान-सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेली 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत पुढे काय होणार पाहणे मनोरंजक ठरणार आहे. समर खरं सत्य कसं सर्वांसमोर घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका दररोज 7:30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT