Kitchen Tips : महागडा नॉनस्टिक पॅन लवकर खराब होतोय? वापरताना या 6 चुका टाळा,अन्यथा निघून जाईल कोटिंग

Non stick pan care : किचनमधील काम सोपे करणारा नॉनस्टिक पॅन जर काही महिन्यांतच खराब होत असेल, तर कदाचित तुमच्याकडून वापरताना काही चुका होत आहेत.
Common cooking mistakes that ruin non-stick cookware
Common cooking mistakes that ruin non-stick cookwaresaam tv
Published On: 

स्वयंपाकघरात नॉनस्टिक तव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डोसा, चपाती, ऑम्लेट किंवा इतर पदार्थ बनवताना अन्नपदार्थ तव्याला चिकटू नयेत, यासाठी नॉनस्टिक तव्याला पसंती दिली जाते. मात्र, अनेकदा महागडा आणि नवीन तवा खरेदी करूनही काही महिन्यांतच त्याचे नॉनस्टिक कोटिंग खराब होऊ लागते. यामागे तव्याचा दर्जा नव्हे, तर वापरताना नकळत होणाऱ्या काही चुका कारणीभूत असू शकतात. त्यामुळे नॉनस्टिक तवा दीर्घकाळ टिकवायचा असेल, तर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गरम तव्यावर लगेच थंड पाणी टाकणे

स्वयंपाक झाल्यानंतर अनेक जण गरम पॅन थेट नळाखाली धरून धुतात. मात्र, गरम तव्यावर अचानक थंड पाणी टाकल्याने तापमानात झपाट्याने बदल होतो. याला 'थर्मल शॉक' असे म्हणतात. त्यामुळे तव्याच्या पृष्ठभागाचे आणि कोटिंगचे नुकसान होऊ शकते. म्हणून तवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच धुवावा.

Common cooking mistakes that ruin non-stick cookware
Curd Eating: रात्री जेवल्यानंतर दही खायला आवड? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम; जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

खरखरीत स्क्रबरचा वापर

नॉनस्टिक तवा स्वच्छ करण्यासाठी स्टीलचा स्क्रबर किंवा खरखरीत घासणी वापरणे टाळावे. यामुळे तव्यावरील संरक्षक कोटिंग हळूहळू निघू लागते. त्याऐवजी मऊ स्पंज आणि सौम्य भांडी धुण्याच्या द्रवाचा वापर करावा.

मोठ्या आचेवर स्वयंपाक करणे

नॉनस्टिक तव्याचा वापर करताना गॅसची आच मध्यम किंवा मंद ठेवणे योग्य ठरते. सतत मोठ्या आचेवर तवा तापवल्यास त्याच्या कोटिंगचे नुकसान होऊ शकते. तसेच रिकामा तवा बराच वेळ गॅसवर गरम ठेवणेही टाळावे.

स्टीलच्या चमच्यांचा वापर

नॉनस्टिक तव्यावर स्वयंपाक करताना स्टीलचे चमचे, काटे किंवा इतर धातूंची साधने वापरू नयेत. त्यांच्या घर्षणामुळे तव्यावर ओरखडे पडू शकतात आणि कोटिंग खराब होऊ शकते. त्याऐवजी लाकडी, सिलिकॉन किंवा उष्णतारोधक प्लास्टिकच्या साधनांचा वापर करावा.

Common cooking mistakes that ruin non-stick cookware
Travel Tips :वंदे भारतमध्ये चुकून अडकलात? घाबरू नका, दंड टाळण्यासाठी जाणून घ्या हे ३ नियम

डिशवॉशरमध्ये पॅन धुवा

नॉनस्टिक पॅन डिशवॉशरमध्ये धुण्यापूर्वी उत्पादकाने दिलेल्या सूचना तपासाव्यात. शक्यतो हाताने मऊ स्पंज आणि सौम्य साबणाचा वापर करून तवा स्वच्छ करावा. कठोर रसायनांचा वापर टाळावा.

इतर भांड्यांसोबत पॅन ठेवणे टाळा

स्वयंपाकघरात नॉनस्टिक पॅन इतर स्टीलच्या भांड्यांसोबत एकावर एक ठेवू नये. त्यामुळे घर्षण होऊन तव्याच्या कोटिंगवर ओरखडे पडू शकतात. तवा स्वतंत्र ठेवावा किंवा त्यामध्ये मऊ कापड अथवा संरक्षक आवरण ठेवावे.

नॉनस्टिक तव्याचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याचा योग्य वापर आणि काळजी घेणे आवश्यक आहे. या छोट्या चुका टाळल्यास तव्याचे कोटिंग सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नवीन पॅन वारंवार खरेदी करण्याची वेळ टाळता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.