श्रद्धा कपूरचा 'ईठा' चित्रपट लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे.
'ईठा' हा चित्रपट २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
'ईठा' चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
बहुप्रतीक्षित चित्रपट 'ईठा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाचा टीझरची झलक पाहायला मिळाली. हा लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. टीझरमुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. अशात अशात चित्रपटाची नाव बदलण्याची बदलण्याची मागणी करण्यात आली आहे, याचे परिपत्रक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने शेअर केले आहे.
बाबासाहेब पाटील (प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग) यांनी परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान, लावणी आणि तमाशा परंपरेला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती होत आहे. ही बाब महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची आहे. मात्र या चित्रपटाचे नाव 'ईठा' असे ठेवण्यात आले असल्याचे समोर आले.
'ईठा' या नावाबद्दल राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप नोंदवला आहे. ज्या महान कलाकाराच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराचे नाव विठाबाई नारायणगावकर आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कलेचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव 'विठाबाई' किंवा 'विठा' असे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला नवी ओळख दिली. त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या नावातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि इतिहासाची ओळख पुढे जाणे गरजेचे आहे. असे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सांगितले.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जीशान अय्यूब हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'ईठा' हा चित्रपट २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.