Veen Doghantali Hi Tutena saam tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीमध्ये मैत्रीचे नाते खुलताना दिसणार आहे.

Shreya Maskar

व्हॅलेंटाईन डे स्पेशल फेब्रुवारी महिना साजरा केला जाणार आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर-स्वानंदीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

समर-स्वानंदीमध्ये मैत्रीची सुरूवात होणार आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतेच मालिकेत अंशुमनचे खरं रूप सर्वांसमोर स्वानंदी उघड करते. ज्यामुळे स्वानंदी विषयी समरच्या मनात चांगली भावना येते. स्वानंदी समरच्या मनात विश्वास निर्माण करते. आता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या स्वानंदी आणि समरच्या आयुष्यातही प्रेमाचे वारे वाहताना दिसणार आहे. ज्याची सुरुवात मैत्रीपासून होणार आहे.

स्वानंदी आणि समरच्या नात्यात लग्नापासून अडथळे येत असतात. त्यांच्यात दुरावा निर्माण होत होता. मात्र आता कुठे तरी त्यांचे नातं खुलताना दिसणार आहे. याचा खास प्रोमो समोर आला आहे. ज्यात स्वानंदी आणि समर डेटला गेलेले पाहायला मिळत आहे. लग्नानंतर स्वानंदी आणि समर आपला पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मराठी अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, छान रोमँटिक डेटचा सेटअप दिसत आहे. हार्टशेप केक, कँडेल लाइट डिनर, सुंदर सजावट , लाइटिंग यामुळे वातावरण रोमँटिक झाले आहे. मात्र स्वानंदी आणि समरमध्ये मैत्री नसल्यामुळे चिठ्ठीत लिहिलेला प्लान वाचून दोघेही अस्वस्थ होतात. समर म्हणतो की, "हे सगळे मला जमणार नाही... " त्यावर स्वानंदी म्हणते, "मलाही हे जमणार नाही..." त्यानंतर स्वानंदी समर पुढे मैत्रीसाठी हात पुढे करते. समरही तिची मैत्री स्वीकारतो.

व्हिडीओच्य कॅप्शनमध्ये लिहिलं की, "स्वानंदी आणि समरमधील मैत्री खुलणार नात्यांची वीण घट्ट होणार..." 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. या प्रोमोवर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. प्रेक्षक स्वानंदी आणि समरची मैत्री, त्यांचे प्रेमाचे नाते फुलताना पाहायला उत्सुक आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने समर-स्वानंदीच्या मैत्रीला सुरुवात होणार आहे. आता या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे होणार, पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अशी वेळा शत्रूवरही ये नये! बँकेला मृत्यूचा पुरावा हवा होता, भाऊ चक्क बहि‍णीचा सांगाडाच घेऊन आला

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT