Shreya Maskar
समर-स्वानंदीचा महाविवाह सोहळा 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर ला दाखवला जाणार आहे. त्यातही 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान समर-स्वानंदी लग्नगाठ बांधणार आहे.
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या लगीन घाई पाहायला मिळत आहे. समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळ्यातील लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
नुकताच स्वानंदीचा म्हणजेच तेजश्री प्रधानचा चुडा भरण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी स्वानंदीने पारंपरिक लूक केला आहे. तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. फोटोंमध्ये स्वानंदी खूपच गोड दिसत आहे.
मोकळे केस, मॅचिंग ज्वेलरी, मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या हातात हिरवा चुडा पाहायला मिळत आहे. या लग्न सोहळ्याने सरपोतदार आणि राजवाडे कुटुंब एकत्र येणार आहे.
समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने गोव्याच्या समुद्रकिनारी पार पडणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधानच्या चुडा भरण्याच्या कार्यक्रमातील लूकचे सर्वत्र कौतुक होते आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. प्रेक्षक या मालिकेसाठी खूपच उत्सुक असतात.