Shreya Maskar
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या भावाने अल्लू शिरीष लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
लोकप्रिय अभिनेता अल्लू शिरीषने आपल्या प्रेयसी नयनिकासोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ही दोघे अनेक वेळापासून एकमेकांना डेट करत होते.
अल्लू शिरीषने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.
अल्लू शिरीषने फोटोंना खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "मी माझ्या आयुष्यातील प्रेम नयनिकाशी आनंदाने साखरपुडा केला..."
अल्लू शिरीषच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साखरपुड्यासाठी दोघांनी पारंपरिक लूक केला होता.
फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. या सोहळ्याला मित्रमंडळी आणि जवळचे कुटुंब पाहायला मिळाले.
साखरपुड्यासाठी अल्लू शिरीषने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर अल्लू शिरीषच्या होणाऱ्या बायकोने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
मिनिमल मेकअप, मोत्यांची ज्वेलरी, मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला होता. चाहत्यांना ही जोडी खूपच आवडली आहे.