Shreya Maskar
आज (1 नोव्हेंबर ) बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या रायचा वाढदिवस आहे. ऐश्वर्या आज 52 वर्षांची आहे.
ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. 1997 साली रिलीज झालेल्या 'इरुवर'मधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला 'दिल दे चुके सनम' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली.
ऐश्वर्या रायने 2007 साली अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. 2011 ला ऐश्वर्या आणि अभिषेक आई-बाबा झाले. ऐश्वर्याने आराध्या बच्चनला जन्म दिला.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. यात 'धाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना कहो', 'सरकार राज', 'रावण' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
ऐश्वर्या रायकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात रोल्स रॉयस, ऑडी, मर्सिडीज, लेक्सस एलएक्स, टोयोटा वेलफायर यांचा समावेश आहे.
ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी जवळपास 10-12 कोटी मानधन घेते. तर एका जाहिरातीसाठी 6-7 कोटी घेते.
ऐश्वर्या राय आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील जुहू येथे राहते. तसेच तिची वांद्रे बीकेसीमध्ये प्रॉपर्टी आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटी रुपये आहे. तर अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती अंदाजे 280 कोटी रुपये आहे. अभिषेक पेक्षा ऐश्वर्याची संपत्ती जास्त आहे.